Ad will apear here
Next
‘डिक्की’तर्फे पुण्यात उद्योजकता विकास कार्यक्रम
येत्या आठ तारखेला संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : संरक्षण मंत्रालय भारत सरकार व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (डिक्की) संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी पुण्यात आठ फेब्रुवारी रोजी ‘उद्योजकता विकास आणि बायर-सेलर मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या वेळी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके आणि डिक्की महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश जगताप, डिक्कीचे अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे उपस्थित असणार आहेत.

डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे
भारत सरकारच्या अंगीकृत उपक्रमांमार्फत सेवा व वस्तूंची जी खरेदी केली जाते, त्याच्या चार टक्के खरेदी ही अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांकडून करणे अनिवार्य आहे आणि संरक्षण मंत्रालयाच्या उपक्रमांनीही ती करणे अपेक्षित आहे. 

या संबंधीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार

या कार्यक्रमात अनुसूचित जाती व जमातीच्या इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन, सुटे भाग बनवणारे, प्रिसिजन व सेवा पुरवणारे अशा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांसाठी संधी आहे. कार्यक्रमासाठी सात फेब्रुवारीपर्यंत आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून, सदस्य होणेही आवश्यक आहे. तसेच हा कार्यक्रम सशुल्क असून, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (डिक्की) कार्यालयात सकाळी दहा ते सहा या वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. 

या कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, माझगाव डॉक, महाराष्ट्रातील ॲम्युनिशन फॅक्टरीज, गोवा शिपयार्ड, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (नाशिक) सहभागी होतील. अशी माहिती डिक्कीतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZXLBX
Similar Posts
‘डिक्की’च्या एक हजार उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात संधी पुणे : ‘आगामी काळात संरक्षण मंत्रालयासाठी पुरवठादार म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) किमान एक हजार उद्योजक काम करतील,’ अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी व्यक्त केली.
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.
‘ग्रामीण भागातील महिला आजही हक्कांपासून वंचित’ पुणे : ‘महिलांचा जागर, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान, त्यांना समान स्थान हे चित्र बहुतांशी वेळा आपल्याला शहरी भागातच दिसते;पण ग्रामीण भागातील महिला आजही घराबाहेर पडू शकत नाही. त्यांना शिक्षणाचं, विचाराचं स्वातंत्र्य नाही. विशेषतः दलित महिला आजही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत,’ अशी खंत प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी येथे व्यक्त केली
अनुसूचित जातीजमातीच्या उद्योजकांसाठी राज्यस्तरीय परिषद पुणे : ‘भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन तीन जानेवारीला उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language